श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील वेगवेगळ्या भागांमध्ये केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांना खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. यामध्ये एक जवान शहीद असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, दक्षिण काश्मीरस्थित कुलगाममध्ये ४ दहशतवादी मारले गेले. तर केरन सेक्टरमध्ये दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होते. यावेळी सुरक्षा दलांनी इतर ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत भारताचा १ जवान शहीद झाला आहे. तर इतर दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान, चकमक अद्यापही सुरु असल्याचे समजत आहे.
In this operation, 1 Indian Army soldier has been lost his life while 2 more are critically injured. Operations to evacuate the injured have been hampered by heavy snow and rough terrain conditions. Operation is still in progress: Army sources https://t.co/BKPo6NiVv9
— ANI (@ANI) April 5, 2020