सातारा – करोना अनुममानित म्हणून सातारा जिल्हा रुग्णालयात चार व कराडला पाच असे नऊ रुग्ण मंगळवारी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. सातारा जिल्ह्यात परदेश दौरे करुन आलेले एक महिला व एक पुरूष असे दोन प्रवासी तसेच इस्लामपूर येथील करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले दोन पुरुष असे चार जण अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत.
तसेच कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील विलगीकरण कक्षात पाच पुरुष अनुमानित म्हणून दाखल करण्यात आले आहेत. या सर्व रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुण्यातील “एनआयव्ही’कडे तपासणीकरीता पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.