-->

Gajanan Marne | कुख्यात गजा मारणेसह नऊ जणांना न्यायालयीन कोठडी

पुणे(प्रतिनिधी)  –  नवी मुंबई येथील तळोजा करागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढीत शक्तीप्रदर्शन केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ( Gangster Gajanan Marne ) कुख्यात गजानन ऊर्फ गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांची रवानगी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी याबाबत आदेश दिला.

या प्रकरणात 200 जणांविरोधात गुन्हा दाखल असून, गुन्हा दाखल झालेल्या 27 जणंची नावे निष्पन्न झाली आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या तीनशे गाड्यांची माहिती काढून त्या जप्त करायच्या आहेत. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी कोणी आर्थिक सहाय्य केले याचा तपास करायचा असल्याची बाजू सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आली.

गजानन उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय 48), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 36), बापु श्रीमंत बागल (वय 34), आनंता ज्ञानोबा कदम (वय 37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40) श्रीकांत संभाजी पवार (वय 34) आणि सचिन आप्पा ताकवले (वय 32) यांना अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे संजय दीक्षित यांनी बाजू मांडली. तर, बचाव पक्षाच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी काम पाहिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.