निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर तीव्र शब्दात टीका ; संबोधले सरडा !

मुंबई: शिवसेना भाजपची युती झाल्यापासून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. गेली चार वर्ष एकमेकांविरोधात बंड फुकारणारे भाजप-सेना आगामी निवडणुकांसाठी एकत्र आले. शिवसेनेने अचानक भूमिका बदलल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

दरम्यान निलेश राणे यांनी शिवसेनेनवर टीका केली आहे. देशात काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यात ४९ जवान शहीद झाले, याची देशभर संतापाची लाट असताना, दुसरीकडे भाजपा-सेना यांची युती झाली म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते रत्नागिरीत पेढे वाटत आहेत याचा जाहीर निषेध करावा तितका कमी असल्याचे राणे म्हणाले.

तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंवर तीव्र शब्दत टीका केली आहे, “इतका फालतू माणूस पाहिला नाही. शिवसेनेचा पक्षप्रमुख तर वाटत नाही पण उद्धव ठाकरे सरड्यांचा पक्षप्रमुख नक्की होऊ शकतो. जगातले सरडे घाबरले असतील उ.ठा ची पलटी मालिका बघून”

Leave A Reply

Your email address will not be published.