मुंबई – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी नोटीस बजावली. मात्र, यावरुन आता शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. शिवसैनिकांनी मुंबईतील ED कार्यालय, भाजपच्या कार्यालयाबाहेर होर्डिंग ठोकल्यानंतर आता डोंबिवलीत शिवसेनेतर्फे #wesupportSanjayRaut चे बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले ‘आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल’. देशा बाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे, अशी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले “आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल”. देशा बाहेर नोकरी द्यायचा धंदा चालू केला की काय शिवसेनेने?? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचं काम हाती घेतलं?? ह्या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 29, 2020
दरम्यान, संजय राऊत यांनी सोमवारी भाजपवर कडाडून टीका केली. अंमलबजावणी संचनालयाची कारवाई करणे म्हणजे एका राजकीय पक्षाने आपली भडास काढणे आहे. कुटुंबातील महिलांवर मुलांवर राग काढणार असाल तर त्याच पध्दतीने उत्तर देऊ. भारतीय जनता पक्षाच्या 120 जणांच्या गैरमर्गाने केलेल्या संपत्तीची माझ्याकडे यादी आहे. आधी त्यांची चौकशी करा मग मी 10 वर्षापुर्वी काढलेल्या कर्जाची चौकशी करा.
मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला काय उखडून घ्यायचे ते घ्या, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आव्हान दिले. त्याच बरोबर हे सरकार पाडण्याचा विडा भाजपाच्या नेत्यांनी उचलला असून त्यासाठी सरकारी यत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप करत भाजपाला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच त्यांनी दिला होता.