Nilesh Lanke | खासदार निलेश लंके यांनी सोयाबीन खरेदी प्रश्नावरून थेट संसदेबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्यांची मुदतवाढ मिळावी ही मागणी करत त्याबाबत मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहोत. जर आमच्या मागणीची दखल घेतली गेली नाही, तर थेट सोमवारी संसदेबाहेर या प्रश्नावर आंदोलन करू, असा इशारा निलेश लंके यांनी दिला आहे.
संसदेच्या अधिवेशनासाठी निलेश लंके नवी दिल्लीमध्ये असून काल त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर पवार त्यांनी याबाबत पत्रक काढले. त्यात त्यांनी म्हटले आहे, सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळालीच पाहिजे. यासंदर्भात मंत्री महोदयांशी पत्रव्यवहार करणार असल्याचेही म्हटले आहे. Nilesh Lanke |
सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी
माध्यमांशी संवाद साधताना लंके म्हणाले, सोयाबीन खरेदीसाठी शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळाली पाहिजे. यासंदर्भात संबंधित मंत्रीमहोदयांशी आपण पत्रव्यवहार करणार आहोत. सोयाबीन खरेदीस मुदतवाढ मिळाली नाही तर संसदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करणार असल्याचे खा. लंके यांनी जाहीर केले.
आजही सोयाबीन खरेदी केंद्रांवर शेतकरी विविध वाहनांमधून सोयाबिन घेऊन आल्याचे दिसते. आठ दिवसांची मुदत वाढ देऊन काही होत नाही. किमान एक महिन्याची मुदत वाढ द्यायला हवी. शेतकऱ्यांना द्यायचे असेल तर मोकळ्या मनाने दिले पाहिजे. आठ दिवस मुदतवाढ दिल्यानंतर त्याची माहिती होण्यात दोन दिवस जातात. मग चार-पाच दिवसांत काय होणार? असा सवाल खा. लंके यांनी केला. तसेच संसदेत आल्यानंतर पहिला प्रश्न दुध, कांदा, सोयाबीनचा मांडला होता. यावेळच्या अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मागण्या केल्या असल्याचे लंके यांनी सांगितले.
हेही वाचा :