नीलेश घायवळची रवानगी ‘येरवड्यात’

नगर जिल्ह्यातून पुणे पोलिसांनी केली अटक

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिवन देशमुखही “ऍक्‍शन मोड’मध्ये आले आहेत. ग्रामीण पोलिसांनी घायवळ टोळीचा म्होरक्‍या निलेश घायवळला अटक केली आहे. पुढील वर्षभरासाठी त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

निलेश घायवळ याच्याविरुद्ध यापूर्वी मोक्‍का, खून, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, दंगा, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍यातील सोनेगाव येथून ताब्यात घेतले. देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यावर निर्णय घेत घायवळला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.

सामाजिक कार्यावर पाणी
नीलेश घायवळ याने पुणे जिल्ह्यातून तडिपार झाल्यावर जामखेड तालुक्‍यात मुक्‍काम ठोकला होता. तेथे त्याने मोठ्या प्रमाणात समाजकार्य सुरू केले होते. तो निवडणुकीला उभा राहणार असल्याचीही चर्चा होती. त्याने गावात सुधारणा करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. मात्र, आता पुढील वर्षभर त्याचा मुक्‍काम कारागृहात असणार आहे. यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूकही तो लढू शकणार नाही

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.