लातूर : निलंगा शहरात ८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व व्यक्ती हरियाणाच्या फिरोजपूर झिरक येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते . त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात येणार असल्याचे लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
२ एप्रिलच्या मध्यरात्री हे सर्व १२ जण जामबाग मज्जीदमध्ये आढळून आले होते. त्यातील आत जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पोलिसांना काही जण जामबाग मज्जीदमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील ८ रुग्णाची नमुने पॉझिटिव्ह आल्याने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.