Pontevedra, Spain : स्पेन येथील 20 वर्षांखालील कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या निकिताने 62 किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईलमध्ये रौप्य तर नेहाने 57 किलोमध्ये कांस्य पदकाची कामगिरी बजावली. या स्पर्धेमध्ये भारताने 5 पदकांच्या साहाय्याने दुसरे स्थान राखले.
Update: U-20 World Wrestling Championships , Pontevedra, Spain 🇪🇸☑️
Our female wrestlersshine bright as they bag 2️⃣ more medals in their respective categories.
Take a look at the latest medallists 👇
1. Nikita: #Silver🥈in WW 62kg category.
2. Neha: #Bronze🥉in WW 57kg… pic.twitter.com/uFrhhveZAN
— SAI Media (@Media_SAI) September 7, 2024
मागील वर्षी झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेची विजेत्या असलेली निकिताला अंतिम लढतीत युक्रेनच्या इरिना बोदरकडून 4-1 असा पराभव स्वीकारावा लागला. नुकतेच 17 वर्षांखालील विश्व कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या नेहाने 57 किलो फ्रीस्टाईलमध्ये हंगेरीच्या गेरडा टेरेकला 10-8 असे पराभूत करून कांस्यपदकावर आपली मोहोर लावली.
या स्पर्धेत भारताने 1 सुवर्ण, 1 रौप्य व तीन कांस्य असे एकूण पाच पदकांची कमाई केली. भारताच्या ज्योती बेवालने 76 किलो वजनीगटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. थांबर कोमलने 59 किलो वजनी गटात तर सृष्टीने 68 किलो वजनी गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. गेल्या वर्षी जॉर्डन येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने चार सुवर्ण, तीन रौप्य व सात कांस्य अशी एकूण 14 पदके जिंकली होती.