निखिल शिंदेंना राष्ट्रवादीच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी संधी द्या

युवक वर्गातून जोरदार मागणी

कराड – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले निखिलदादा शिंदे यांची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड व्हावी, अशी मागणी सातारा जिल्ह्यासह परजिल्ह्यातील युवकांमधून होत आहे.

निखिल शिंदे हे गेले अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. युवा वर्गाला त्यांच्याकडून एक वेगळीच ऊर्जा मिळते. स्व. यशवंतरावजी चव्हाण व शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांवर व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सामाजिक कार्याची घोडदौड नेहमी चालू आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात निखिल शिंदे यांचे मोठे योगदान असते. गोरगरिबांच्या मदतीसाठी, त्यांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, श्रवणयंत्र वाटप यासारखे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत निखिल शिंदे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देणे आवश्‍यक आहे. सर्वसामान्यांचे नेतृत्व भक्कम संघटन कौशल्य या निखिल शिंदे यांच्या जमेच्या बाजू आहेत.

पक्ष बळकटीसाठी त्याचा निश्‍चितपणे उपयोग होईल. कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता निःस्वार्थ वृत्तीने फक्त हाती घेतलेले कार्य करीत राहणे हीच त्यांची ओळख आहे. पक्षाने अशा युवकाला संधी द्यावी, ही भागातील युवकांची मागणी असून पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवणे त्यांच्या जनसंपर्कातून सहज शक्‍य होणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात पक्षाने दिलेल्या संधीचे ते नक्की सोने करतील. आज प्रतिकुल राजकीय परिस्थितीत पक्षाचे विचार अधिक जोमाने लोकांपर्यत पोहोचवून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस अधिक बळकट बनेल, अशी भावना युवकांमध्ये आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळावी, अशी मागणी युवकवर्गातून जोर धरीत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.