निखिल कुमारस्वामी यांना हादरा? सुमनलता आघाडीवर

नवी दिल्ली – कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांना हादरा बसण्याची चिन्हे दिसत आहेत. कर्नाटकमधील मंड्या या मतदारसंघात सुमनलता अंबरीश या १२०० मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात त्यांच्यासमोर एच डी कुमारस्वामी यांचे पूत्र निखील हे रिंगणात आहेत.

सुमनलता यांना आतापर्यंत ८५७६५ तर निखील कुमारस्वामी यांना ८४६१६ मते मिळाली आहेत. सुमनलता या कर्नाटकमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते अंबरीश यांच्या पत्नी असून अंबरीश हे १९९८ ते २००९ या कालावधीत तीन वेळा या मतदारसंघाचे खासदार होते. या जिल्ह्यात देवेगौडा कुटुंबाची ताकद असून भाजपाने या भागात सुमनलता यांना पाठिंबा दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.