अहमदाबाद – अहमदाबाद मध्ये 57 तासांची संचारबंदी लागू केल्यानंतर गुजरात सरकारने करोनाचा प्रसार रोखण्यासाठी या राज्यातील आणखी तीन शहरांमध्ये रात्रीची संचार बंदी लागू केली आहे. सूरत, बडोदा आणि राजकोट या तीन शहरांमध्ये ही संचारबंदी लागू राहणार आहे.
आज शनिवारपासूनच त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. रात्री नऊ ते सकाळी सहा या काळात ही संचारबंदी लागू असेल असे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले. गरजेनुसार त्या संचार बंदीची मुदत वाढवलीही जाऊ शकते, त्यामुळे नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.
गुजरात मध्ये अहमदाबाद शहरासह सर्व महत्वाच्या शहरांमध्ये पुन्हा करोनाचे प्रमाण वाढल्यामुळे ही उपाययोजना केली जात आहे.