बारामतीत आजपासून रात्रीचा कर्फ्यू लागू

रात्री 7 ते सकाळी 9 वाजेपर्यंत कडक अंमलबजावणी

बारामती – करोनाची रुग्णसंख्या वाढल्याने मंगळवारपासून (दि.23) बारामती शहरात संध्याकाळी सात ते सकाळी नऊपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इतर सर्व दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी सातपर्यंत सुरू ठेवता येतील.

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीस उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, डॉ. सदानंद काळे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेते सचिन सातव, संभाजी होळकर उपस्थित होते. दरम्यान, शहरातील सूर्यनगरी व गणेश मंडई परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे. पुढील आदेश येईपर्यंत या परिसरातील सर्व व्यवहार बंद राहतील. या निर्णयाची व्यापाऱ्यांना पूर्वकल्पना दिली आहे. दरम्यान, अधिगृहित केलेल्या 16 रुग्णालयांची पाहणी करण्यात येणार आहे.

ऑक्‍सिजनची आवश्‍यकता नसलेल्या रुग्णांना जनरल वॉर्डमध्ये हलविणार आहेत. ऑक्‍सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी तात्काळ बेड उपलब्ध करण्यात येतील. निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरपालिका भाडेतत्त्वावर ट्रॅक्‍टर घेऊन औषध फवारणी करणार आहे.

ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर म्हणाले की, उद्यापासून नटराज नाट्य कला मंडळ तिसरे कोविड केअर सेंटर तारांगण वसतिगृहाशेजारी सुरु करणार आहे. नटराजच्या दोन कोविड केअर सेंटरची 200 रुग्णांची क्षमता संपल्याने आता तिसरे सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.