लष्करी विमानाचा अपघात; 7 जण ठार

लागोस – नायजेरियात रविवारी लष्करी विमानाचा अपघात झाला आणि त्यातील सर्व 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

द किंग एअर 350 या विमानाने नायजेरीयातील अबुजा विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात हा अपघात झाला. इंजिन बंद पडल्यामुळे वैमानिकाने विमान परत फिरवण्याचाही प्रयत्न केला होता, असे नायजेरियन हवाई दलाचे प्रवक्‍त्याने एका ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

या विमान अपघाताच्या कारणाची चौकशी करण्याचे आदेश हवाई वाहतुक मंत्री हादी सिरीका यांनी दिले आहेत. हे अबुजा शहराचा वायव्येकडे 100 किलोमीटरवरील मिन्ना शहराकडे हे विमान निघाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.