बॉलीवूडमधील देशी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी जोन्स ब्रदर्सनी “सकर’ व्हिडिओ रिलीज केला होता. त्यानंतर “कूल’ नामक व्हिडिओ प्रदर्शित केला असून तो खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत निक जोन्स, केविन जोन्स आणि जो जोन्स हे तिघेही खूपच कूल अंदाजात दिसत आहे.
निकची पत्नी अर्थात प्रियांका चोप्राच्या एका फॅन पेजने इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या नव-याचा एक डब व्हर्जन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हर्जनमध्ये बॉलिवूडचा तडका दिसून येत आहे. त्याचे असे की, प्रियांकाने शेअर केलेल्या या व्हिडिओत गोविंदाच्या “मेरी पॅंट भी सेक्सी’ या गाण्यावर निक जोन्स डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे.
दरम्यान, प्रियांका सध्या तिच्या आगामी “द स्काइ इज पिंक’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. शोनाली बोस यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम झळकणार आहेत. या चित्रपटाबाबत प्रियांकाच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून तो लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.