प्रियांका चोप्रा तिचा पती गायक निक जोनसला अमेरिकेतील लेक टाहो, नेवाडा येथे गोल्फ खेळत असताना सपोर्ट करताना दिसून आली. इंस्टाग्रामवरील एका चाहत्याने ‘ACC गोल्फ चॅम्पियनशिप’ दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. निक गोल्फ खेळत असताना प्रियांका त्याच्या मागे उभी होती.
View this post on Instagram
दुसर्या व्हिडिओमध्ये निक जोनस फॅनसोबत पोज देताना दिसत आहे तर प्रियांका त्याच्या मागे गोल्फ कार्टवर बसलेली दिसत आहे. तसेच ती एका माणसाशी बोलताना दिसली. प्रियांकाने पांढरा टॉप, शॉर्ट्स, ब्लू जॅकेट आणि कॅप घातलेली दिसत आहे. प्रियांका निकच्या चाहत्यांना त्यांचा हा अंदाज खूपच आवडतोय कारण अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.
View this post on Instagram
निक जोनस गडद निळ्या रंगाचा टी-शर्ट, काळी पँट आणि टोपी घातलेला दिसतो. दोघांनी पांढऱ्या रंगाचे बूट घातले आहेत. एका व्हिडिओमध्ये प्रियांका निकसोबत उभी असताना गेम पाहत असताना दिसत आहे. एका चाहत्यासाठी ऑटोग्राफवर स्वाक्षरी देखील करताना ती हसली. विशेष म्हणजे या जोडीला सोबत गोल्फ खेळताना पाहून अनेकांनी उत्साहाच्या भरत कॅमेंटचा पाऊस पाडला आहे.
प्रियांका चोप्राची ही स्टाइल चाहत्यांना आवडली
या जोडप्याने गोल्फ कोर्सचा फेरफटकाही मारला. खेळ संपताच प्रियांकाने चाहत्यांच्या उपस्थितीत मैदान सोडले. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने कमेंट केली की, ‘प्रियांका तिथं असल्यामुळे खूप आनंदी दिसत आहे. दुसऱ्या एकाने मदत करणारी पत्नी असे कॅप्शन देऊन फोटो शेअर केला आहे. तर अनेकांनी ‘प्रियांका सुंदर दिसतेय अशी देखील कमेंट केल्या आहेत.
जेव्हा निक कोणत्याही खेळात भाग घेतो तेव्हा अनेकदा प्रियांका त्याच्यासोबत हजर असते. पण या वेळेस गोल्फच्या मैदानात फक्त उभं न राहता प्रियांकाने त्याच्या विजयासाठी हातभार लावल्याने फॅन्स देखील चकित झालेत. स्टार असूनही आपल्या नवऱ्याला मदत करणाऱ्या प्रियांकाला पाहून अनेकांना आश्चर्य वाटलंय.प्रियांका ‘इट्स ऑल कमिंग बॅक टू मी’ आणि सीरिझ ‘सिटाडेल’ सारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये ती आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत दिसणार आहे.