चेन्नई : तामिळनाडू पोलिस दलातील उपनिरीक्षक वाय. विल्सन यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तामिळनाडूत अनेक ठिकाणी छापे टाकले. थूथुकुडी कुड्डालोर, सालेम, नेव्येली आणि चेन्नई येथे एकाच वेळी सोमवारी छापे टाकण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
तामिनाडू – केरळ सिमेवरील तपासणी नाक्यावर विल्सन यांची हत्या केल्याच्या आरोपावरून ए. अब्दूल शमीम आणि तौफीक या दोन आरोपींना पोलिसांनी यापुर्वी अटक केली आहे. त्यांना कर्नाटकातील उडपी येथून आठ जानेवारीला ताब्यात घेण्यात आले.
इसिसचा हस्तक सी खाजा मोईद्दिन याला अटक करण्याच्या कारवाईचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. एनआयए वनावट कागदपत्रांच्या आधारे दहशतवाद्यांना दिलेल्या सीमकार्डचाही शोध घेत आहेत. गेल्या महिन्यात तामिळनाडू पोलिसांनी हा गुन्हा एनआयएकडे वर्ग केला.