मध्यंतरी पंजाबी सिंगर गुरु रंधवाच्या दिवाळीच्या पार्टीमध्ये निया शर्माही सहभागी झाली होती. तिथे पंजाबी रॉक म्युझिकवर डान्स करताना निया अगदी बेभान झाली होती. तिच्या डान्सचे जलवे बघण्यात सगळेजण दंग झाले होते. पण तेवढ्यातच डान्स फ्लोअरवर एक दुर्घटना घडली.
तिच्या लहंग्याचे एक टोक तिथल्याच एका दिव्याच्या ज्योतीला लागले आणि निया शर्माच्या लहंग्याने पेट घेतला. मल्टीलेअर लहंगा असल्यामुळे या आगीचे चटके निया शर्माला जाणवले नाहीत. तिथे उपस्थित असलेल्या पब्लिकला ही बाब लगेच समजली आणि ही आग लगेचच विझवण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटन होता होता टळली.
लहंगा थोडा जळाला मात्र निया शर्माचा जीव वाचला. नियाने आपल्या या जळालेल्या लहंग्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “एक दिया की शक्ती, मी वाचले. किंवा माझे रक्षण करणाऱ्या शक्तीने मला वाचवले.’ असे तिने या फोटोबरोबर लिहीले आहे.
एकता कपूरच्या “नागिन’च्या चौथ्या इन्स्टॉलमेंटमध्ये दिया शर्मा दिसनार आहे. काही दिवसांपूर्वीच एकता कपूरने या सुपरनॅचरल थ्रिलरची घोषणा केली आहे. यापूर्वी या सुपरनॅचरल थ्रिलरमध्ये मौनी रॉय आणि सुरभी ज्योतीने लीड रोल केला होता.