नवी दिल्ली : नागालॅन्डमधील बंडखोर गट “एनएससीएन (आयएम)’ या गटाशी संबंधित “टेरर फंडिंग’ प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने नागालॅन्डमध्ये आज ठिकठिकाणी छापे घातले.
पुंगतिंग शिरमिरांग उर्फ जेम्स जामिरची पत्नी आणि या प्रकरणातील मुुख्य आरोपी आलेम्ला जमिर आणि अन्य काही सदस्यांच्या घरांवर “एनआयए’ने छापे घातले. पुंगतिंग शिरमिरांग सध्य फरार आहे.
“एनआयए’ने घातलेल्या छाप्यांमध्ये 82..6 लाख रुपयांची रोकड, तीन कोटी रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे, गुन्हेगारी तपशील असलेली डायरी, छायाचित्रे, डिजिटल उपकरणे, 15 स्मार्ट फोन, एक हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड आणि चार लॅपटॉप जप्त करण्यात आल्या आहेत, असे “एनआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले.
शोधमोहिमेदरम्यान काही बंडखोरी व खंडणी संबंधित साहित्य तसेच इतर गुन्हेगारी कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.