काश्‍मिरात एनआयएचे छापेसत्र

नवी दिल्ली : दहशतवाद्याला काश्‍मीर खोऱ्याबाहेर सोडण्याच्या प्रयत्नाच्या आरोपावरून अटक केलेल्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या तपासात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी सकाळी व्यापक शोध मोहीम राबवली. खासगी कार्यालये आणि निवासस्थानांवर छापे एनआयएच्या विविध पथकांनी टाकले.

काश्‍मिरमध्ये निलंबित पोलीस उपअधिक्षक दविंदर यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दहशतवाद्याला काश्‍मीर खोऱ्याबाहेर सोडण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे धाड सत्र राबवण्यात आले.

हिजबुल मुजाहिद्दीनचा स्वयं घोषित कमांडर नावीद बाबूू याला त्याच्यासोबत अटक करण्यात आली होती. नाविदचा भाऊ सईद इरफान अहमद याला चंदिगढमधून ताब्यात घेण्यात आले. बाबू हा आपल्या भावाच्या सातत्याने ताब्यात होता, असे आढळून आले आहे. काश्‍मिारतील तीव्र थंडी कमी होईपर्यंत चंदीगढमध्ये लपण्याची सुचना त्याने भावाला केली होती.

ही मोटार चालवणारा मीर हा एनआयएसाठी महत्वाचा ठरु शकतो. कारण तो त्याच्या पाकिस्तानी हॅंडलरच्या सुचनेनुसार काम करत असे. त्याच्याकडून दहशतीच्या नव्या पध्दतीबाबबत तसेच पाकिस्तानातील हॅंडलरबाबत माहिती मिळण्याची शक्‍यता आहे. तो भारतीय पारपत्रावर पाकिस्तानात पाचवेळा जाऊन आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.