NIA Raid । केंद्रीय तपास यंत्रणेने कोलकातासह पश्चिम बंगालमधील 12 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हा छापा माओवाद्यांशी संबंधित असलेल्या लोकांच्या जागेवर टाकण्यात आला आहे.”
माओवाद्यांशी संबंध असल्याची माहिती NIA Raid ।
NIA ने नेताजी नगर, पानीहाटी, बराकपूर, सोडेपूर, आसनसोल आणि इतर ठिकाणी छापे टाकले. वास्तविक, दोन महिला आणि त्यांच्या साथीदारांचे माओवाद्यांशी संबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर एजन्सीने छापा टाकला.
छाप्यात अनेक कागदपत्रे जप्त NIA Raid ।
“या महिलांनी पूर्व भारतात माओवादी नेटवर्क पसरवण्यासाठी पाठवलेल्या निधीची उधळपट्टी केली होती. या लोकांनी माओवादी संघटनेत कोणती भूमिका बजावली होती हे शोधण्यासाठी एनआयएचा छापा आहे,” असे सूत्रांनी सांगितले. छाप्यात अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.