‘एनआयए’कडून 10 जणांवर आरोपपत्र

चेन्नई – तमिळनाडूतील “शहादत इज आवर गोल’ या दहशतवादी संघटनेच्या 10 सदस्यांविरोधात “एनआयए’ने शनिवारी आरोपपत्र दाखल केले. देशात सशस्त्र जिहाद पुकारण्याच्या कारस्थानाचा आरोप या 10 जणांवर ठेवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चेन्नईतील “एनआयए’च्या विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

तंजवूर जिल्ह्यातील शेख दाऊद, रामानथपुरम जिल्ह्यातील मोहमद रिफाज, मुपारिश अहमद, अबुबाकर सिद्दीक, हमीद असफर, कुडालोर जिल्ह्यातील मोहमद रशिद, सालेम जिल्ह्यातील लियाकत अली, तिरुवरूर जिल्ह्यातील अहमद इम्तियाज, साजित अहमद, रिझवान मोहम्मद यांच्यावर भारतीय दंड संहिता, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद आणि शस्त्रास्त्रे कायद्याच्या संबंधित कलमांखाली आरोप दाखल करण्यात आले आहेत.

या संदर्भातील या संघटनेच्या तिघांना अटक करण्यात आल्यावर बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत 2018 मध्ये प्रकरण नोंदवण्यात आले होते. या संघटनेच्या सदस्यांकडून तलवारी, “शहादद इज आवर गोल’ या संघटनेची पत्रके जप्त करण्यात आली होती. संघटनेच्या आरोपींनी व्हॉट्‌स ऍपवर ग्रुप करून हिंसक जिहादला चिथावणी द्यायला सुरुवात केली होती. श्रीलंकेतील इसिसचा म्होरक्‍या झहीरन हशिम याच्या प्रक्षोभक भाषणांचे व्हिडीओ पसरवले जात होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.