निया अणि देवोलीनाने मागितली एकमेकींची माफी

ऍक्‍टर पर्ल वी पुरीला बलात्कार प्रकरणामध्ये अटक झाली आहे आणि तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. ंमात्र त्याच्यावरील आरोप खरे की खोटे आहेत, यावरून कॅट फाईट सुरू झाली आहे. निया शर्मा आणि दोवोलीना भट्टाचार्य यांच्यात या मुद्द्यावरून सोशल मीडियावर जोरदार वाद झाले आहेत. दोघींनी एकमेकींना खूप बरे-वाईट सुनावले होते. 

अखेरीस या दोघींना आपली चूक समजली आणि त्यांनी एकमेकींची माफी मागितली आहे. पर्ल वरील आरोप खोटे आहेत असे एकता कपूर, अनिता हंसनंदानी, निया शर्मा, क्रिस्टल डिसूझा आणि करिष्मा तन्ना सारख्या सेलिब्रिटींनी म्हटले होते. तर देवोलीना भट्टाचार्याने या सर्व सेलिब्रिटींचा चांगलाच क्‍लास घेतला होता. 

“धरणे आंदोलन, उपोषण. कॅन्डल मार्च जे काही करायचे असेल ते करा. पण सेलिब्रिटींच्या समर्थनामुळे पर्ल वाचू शकणार नाही. जे याप्रकरणी संवेदनशील नसतील त्यांनाही त्यांच्या कर्माचे फळ मिळेल.’ असे तिने म्हटले होते. 

त्यावर निया शर्मानेही उत्तर दिले. “आंदोलन करता येणार नाही कारण करोनाची साथ सुरू आहे. पण देवोलीनालाच डान्स क्‍लास करण्याची गरज आहे. कारण ती खूपच वाईट डान्सर आहे.’ असे ती म्हणाली. त्यावर देवोलीनाने नियाला आपल्या फोटो शूटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. दोघींनी एकमेकींना भरपूर ऐकवल्यानंतर इन्टाग्रामवर एकमेकींची माफी मागितली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.