उघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली – उघड्यावर कचरा जाळण्याबाबत राष्ट्रीय हरित लवादने (एनजीटी) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पर्यावरण संबंधी समस्यांच्या निवारणासाठी एक मोबाईल अॅप लाँच करण्यासाठीचे आदेश एनजीटी चेअरपर्सन जस्टिस आदर्श कुमार गोयल अध्यक्ष असलेल्या बेंचने दिले आहेत. तसेच उघड्यावर कचरा जाळण्याच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी दिल्ली प्रदूषण समितीच्या अधिकाऱ्यांना याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. यासोबतच त्यावर नियमितपणे लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.

…या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली होती याचिका

पर्यावरण संबंधी समस्यांवर नियंत्रण आणण्यासाठी जसोला निवासी कल्याण संघ नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेने याचिका दाखल केली होती. याचिकेत म्हटले आहे, ओखला सीवेज ट्रीटमेंट प्लांट मध्ये सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघड्यावर कचरा जाळला जात आहे. यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

याचिकेवर सुनावणी करताना एनजीटीने म्हटले आहे, अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा जाळणाची शक्यता आहे त्याठिकाणी त्यांनी नियमितपणे लक्ष ठेवणे. त्यामुळे अशा घटनांमुळे आळा घातल्यास पर्यावरणाचे रक्षण करण्यास मदत होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.