विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर नेमारचे निवृत्तीचे संकेत

ब्राझिलिया – आगामी फुटबॉल विश्‍वकरंडक स्पर्धा ही ब्राझीलकडून खेळत असलेली माझी अखेरची स्पर्धा असेल, असे विधान करत जागतिक फुटबॉल क्षेत्रातील ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारने निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

आता मी त्यापुढील काळात आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये खेळत राहण्याची सध्यातरी माझी मानसिकता राहिलेली नाही. जागतिक फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेल मेस्सी यांच्यानंतर नेमारचेच नाव महान खेळाडूंमध्ये घेतले जाते.

गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः करोना काळात जगातील अनेक खेळाडूंची मानसिकता खालावल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यातच नेमारलाही सातत्याने विविध स्पर्धांसाठी बायोबबलमध्ये राहावे लागले आहे. त्यामुळे कुटुंबाला तसेच खासगी जीवनाला वेळही देता येत नसल्याने नेमर खूप अस्वस्थ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ब्राझीलच्या फुटबॉल संघातील खेळाडूंनी पुढील वर्षी कतारमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेनंतरही सहकारी खेळाडू नेमारला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये कार्यरत राहण्याचा आग्रह केला आहे. ब्राझीलकडून खेळणारा नेमार सध्या क्‍लब फुटबॉलमध्ये पॅरिस सेंट जर्मेनकडून
(पीएसजी) खेळतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.