आयपीएलचा पुढील वर्षीचा लिलाव रद्द

मुंबई – करोनाच्या धोक्‍यामुळे यंदा मार्चमध्ये होणारी आयपीएल स्पर्धा येत्या सप्टेंबर व नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी लिलाव केला होता. हा करार कायम ठेवावा लागत असल्याने आता खेळाडूंना दिलेल्या रकमेत कपात करणे शक्‍य नाही. हा अनुभव लक्षात घेता बीसीसीआय व आयपीएल समितीने पुढील वर्षी म्हणजेच 2021 साली होत असलेल्या आयपीएलचा लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा ही स्पर्धा अमिरातीत येत्या 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होत आहे. 2021 साली होणाऱ्या स्पर्धेसाठी बीसीसीआयने खेळाडूंचा पुन्हा एकदा लिलाव करण्याचे निश्‍चित केले होते. चौदाव्या हंगामासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेता सर्व संघांना सध्याच्याच खेळाडूंचा समावेश करत पुढील वर्षी स्पर्धेत सहभागी व्हावे लागणार आहे.

वैयक्‍तिक कारणाने किंवा अन्य काही अपरिहार्य कारणाने एखाद्या खेळाडूने माघार घेतली तर खेळाडू बदल करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यंदाची स्पर्धा 10 नोव्हेंबरला संपल्यावर केवळ चारच महिन्यांत पुन्हा मार्चमध्ये पुढील स्पर्धा रंगणार असल्याने इतक्‍या कमी कालावधीत लिलाव शक्‍य नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.