नवी दिल्ली- भारतात अनेक नवनवीन बाईक्स बाजारात येत असतात. मग त्या इलेक्ट्रिक असो किंवा इंधनावर चालणाऱ्या असो अशाच काही दमदार बाईक्स बाजारात आल्या आहेत. ह्या बाईक्स इतर बाईक्सच्या तुलनेत उत्तम असून तुमच्या खिशाला परवडण्याऱ्या ठरू शकतात. भारतात हिरो मोटोकॉर्प च्या मोटरसायकल सेगमेंटमध्ये सध्या खूप चलती आहे.
हिरो स्प्लेंडर टॉप सेलिंग बाइक आहे. होंडा अॅक्टिव्हा टॉप सेलिंग स्कूटर आहे. स्कूटर सेगमेंट मध्ये होंडा नंतर टीव्हीएस, सुझुकी आणि हिरो मोटोकॉर्प सोबत यामाहा सारख्या कंपन्या सुद्धा चांगल्या स्कूटरची विक्री करते. तुम्ही जर एक चांगली स्कूटर खरेदीसाठी शोधत असाल तर या ठिकाणी ५ स्कूटरची किंमत आणि मायलेज संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.
१) Honda Activa 6G आणि Activa 125
भारतीय बाजारात सर्वात जास्त विकणारी स्कूटर होंडा अॅक्टिव्हाचे 6G व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ७६ हजार ५१४ रुपये आहे. यात ११० सीसीचे इंजिन दिले आहे. याचे मायलेज ५० किमी प्रति लीटर पर्यंत आहे. तर होंडा अॅक्टिव्हा १२५ सीसीची एक्स शोरूम किंमत ८० हजार ९१९ रुपये आहे. यात 124 cc चे इंजिन दिले आहे. याचे मायलेज ६० किमी प्रति लीटर पर्यंत आहे.
२) TVS Jupiter
टीव्हीएस मोटर कंपनीचे पॉप्यूलर स्कूटरचे ११० सीसी व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ७४ हजार ४२९ रुपये आहे. याचे मायलेज ६४ किमी प्रति लीटर पर्यंत आहे. TVS Jupiter 125 ची एक्स शोरूम किंमत ८४ हजार १७५ रुपये आहे. याचे मायलेज ५७ किमी प्रति लीटर पर्यंत आहे.
३) TVS NTORQ 125
टीव्हीएसचे स्पोर्टी लूक आणि पॉवरफुल इंजिनच्या एनटॉर्क स्कूटरची एक्स शोरूम किंमत ८८ हजार ९१५ रुपये आहे. यात १२५ सीसीचे इंजिन दिले आहे. याचे मायलेज ५४ किमी प्रति लीटर पर्यंत आहे.
४) Suzuki Access 125
सुझुकी अॅक्सेस एक पॉवरफुल आणि फीचर लोडेड स्कूटर आहे. याची एक्स शोरूम किंमत ७९ हजार ४०० रुपये पासून सुरू होते. तसेच ८९ हजार ५०० रुपये पर्यंत जाते. मायलेज संबंधी ही स्कूटर खूपच जबरदस्त आहे.
५) Hero Maestro Edge 125
हिरो मोटोकॉर्पच्या या पॉप्यूलर स्कूटरला तुम्ही ८३ हजार ९६६ रुपयाच्या एक्स शोरूम किंमतीत खरेदी करू शकतात. यात 124 cc चे इंजिन दिले आहे. याचे मायलेज 65 kmpl पर्यंत आहे.