नवी दिल्ली: देशभरात लॉकडाउन सुरू असल्याने अनेक राज्यांमधील महाविद्यालयीन परिक्षा लांबणीवर पडल्या आहेत. तसेच लॉकडाउन आणखी किती दिवस सुरू राहिल हेही अनिश्चित असल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) आज परिक्षांसंदर्भात नवी सुचना जारी केल्या आहेत. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र, जुन्या विद्यार्थ्यासाठी नवं शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्टपासून लागू असणार आहे.
विद्यापीठे उन्हाळी सुट्ट्यांचे आयोजन 30 दिवसांच्या कालावधीत करू शकतील. हा कालावधी 1 जून ते 30 जून 2020 पर्यंत असेल, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे. जर उन्हाळी सुट्ट्या द्यायच्या असतील तर विद्यार्थी 15 मे 2020 पर्यंत ऑनलाइन आदी विविध मार्गाद्वारे शिक्षण घेतली. 16 ते 31 मे 2020 या कालावधीत सबमीशन आणि अन्य कामे पूर्ण करतील.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि नव्या शैक्षणिक सत्रासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वेगवेगळ्या समित्या बनवल्या होत्या. एक समिती हरयाणा विद्यापीठाचे कुलगुरू आर.सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली.