#NZvIND : भारताचे न्यूझीलंडसमोर 253 धावांचे आव्हान; न्यूझीलंड 7 बाद 185(39.0)

वेलिंग्टन – अंबाति रायुडूच्या 90 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 253 धावांचे आव्हान ठेवले आहे. पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघानं 49.5 षटकातं सर्वबाद 252 धावसंख्येपर्यत मजल मारली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सुरूवातीचे चार फलंदाज लवकर बाद झाल्याने भारताची 4 बाद 18 अशी स्थिती झाली होती. रोहित शर्मा 2, शिखर धवन 6, शुभमन गिल 7 आणि महेंद्रसिंग धोनी 1 धावांवर तबूंत परतले. मात्र त्यानंतर अंबाति रायुडूच्या 90, विजय शंकर व हार्दिक पांड्या यांच्या प्रत्येकी 45 आणि केदार जाधवच्या 34 धावांच्या खेळीवर भारताने 252 धावसंख्येपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून मैट हेनरीने सर्वाधिक 4 तर ट्रेंट बोल्टने 3 गडी बाद केले. जिमी नीशमने 1 गडी बाद केला.

दरम्यान पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने पहिले तीनही सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली आहे. त्यानंतरच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. आजच्या पाचव्या सामन्यात विजय मिळवून मालिका 4-1 जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here