नगर -ग्राहकांच्या घरी वर्तमानपत्र पोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना स्वत:च्या आरोग्याची इतरांपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागेल. त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठीही गरज आहे. त्यामुळेच आज सर्वच वृत्तपत्र विक्रेत्यांना होमिओपॅथीक औषधीचे वाटप करण्यात येत असल्याची भूमिका डॉ. वैभव भोईटे यांनी व्यक्त केली.
सावेडी भागातील वृत्तपत्र विक्रेत्यांना आज प्रातिनिधीक स्वरूपात होमिओपॅथीक औषधीचे वाटप करताना ते बोलत होते. करोनाच्या विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. अशावेळी भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने आपल्या देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. त्यातही सर्वाधिक लोकांच्या दारावर जाणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना करोनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. वृत्तपत्र विक्रेत्यांनी यापुढे सुरक्षित अंतर ठेवूनच काम करावे. तोंडाला मास्क लाववा, हात स्वच्छ धुवून घ्यावेत व सॅनिटायझरचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गणेश गांधी यांनी प्रास्तविक केले. करोना विषाणूच्या संकटकाळात वृत्तपत्र विक्रेत्यांनी सध्याची गरज ओळखून डॉ भोईटे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना औषधी गोळ्यांचे वाटप केले. ही खूप समाधनाची बाब असल्याचे गांधी म्हणाले. सर्वच वृत्तपत्र विक्रेत्यांना औषधी मिळणार आहे. ज्यांना औषध मिळाले नाही, त्यांनी संजय गोरे यांच्याशी संपर्क करावा, असेही गांधी म्हणाले.
वृत्तपत्र विक्रेते अतिष गांधी, प्रमोद पंतम, पुरुषोत्तम मडूर, शरद बेरड, देविदास देवगुणे, विनोद खरपे, प्रशांत पंतम, पुरुषोत्तम बेत्ती, राहुल लिमये, शरद बेरड, संदीप लंके, संजय गटणे, अमित पठारे, बाळू पाडळे, जनार्धन दुसुंगे, शशिकांत दुसुंगे, प्रसाद तांदुळवाडकर, विजय मते आदी यावेळी उपस्थित होते.