NewsClick Case : न्यूजक्लिकच्या संस्थापकाला कथितपणे चीनकडून निधी घेतल्याच्या आणि त्यांचा अजेंडा भारतात चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही अटक अटक केली. पोलिसांनी वेबपोर्टलचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवती यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले. त्यानंतर त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती देताना,”दिल्ली पोलिसांनी न्यूजक्लिकचे दिल्लीस्थित कार्यालय सील केले असून 46 संशयितांची चौकशी केली. त्यासोबतच तपासासाठी लॅपटॉप आणि मोबाइल फोनसह डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे कार्यालयातून जप्त केली असल्याची माहिती दिली आहे.
पुढे माहिती देताना,” दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल कार्यालयात 37 संशयितांची चौकशी करण्यात आली, तर नऊ महिला संशयितांची त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, छापेमारी सकाळी सुरू झाली.आदल्या दिवशी पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक पुरकायस्थ यांना विशेष सेलच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. चौकशी केलेल्या व्यक्तींमध्ये उर्मिलेश, औनिंद्यो चक्रवर्ती, अभिसार शर्मा आणि न्यूजक्लिकसाठी काम करणारे परंजय गुहा ठाकुर्ता, सोहेल हाश्मी आणि सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंटचे डी. रघुनंदन यांचा समावेश आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री अनुराग ठाकूर यांनीही मंगळवारी न्यूजक्लिकवरील छाप्याबाबत बोलताना,”देशातील तपास यंत्रणा स्वतंत्र असून त्या कायद्यानुसार काम करतात. ‘जर कोणी काही चुकीचे केले असेल तर तपास यंत्रणा या संदर्भात काम करतात… तुम्ही बेकायदेशीरपणे पैसे कमावले असतील किंवा काही आक्षेपार्ह केले असेल, तर तपास यंत्रणा त्याचा तपास करू शकत नाही, असे कुठेही लिहिलेले नाही.” असे म्हटले होते.