नवी दिल्ली – 2016 मध्ये आजच्या तारखेला म्हणजेच 8 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटाबंदीची घोषणा केली होती. घोषणा होताच सर्वांनाच धक्का बसला. पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करताना आजपासून 500 आणि 1000 च्या नोटा कायदेशीररित्या वैध नसल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. नागरिकांनी 500 आणि 100 च्या जुन्या नोटा बँकेत जमा केल्या आणि त्यांना नवीन नोटा देण्यात आल्या. पण 5 वर्षांपूर्वी जमा झालेल्या त्या जुन्या नोटांचे काय झाले? हा अनेकांच्या मनात प्रश्न आहे.
– बाजारात आल्या नवीन नोटा
नोटाबंदीनंतर 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा आरबीआयच्या देखरेखीखाली जमा करण्यात आल्या. त्या बदल्यात समान मूल्याच्या नवीन नोटा नागरिकांना देण्यात आल्या. आज 500 आणि 2000 च्या नवीन नोटा चलनात आहेत, सोबतच 20, 100 आणि 50 च्या नवीन नोटाही आल्या आहेत. नोटाबंदीच्या काळात 15 लाख कोटींहून अधिक किमतीच्या जुन्या नोटा जमा झाल्या होत्या आणि त्या नोटा आज चलनातही नाहीत.
– नोटांपासून काय बनवलं?
2017 मध्ये, एका आरटीआयच्या उत्तरात, नोटाबंदी केलेल्या नोटांचे विघटन झाल्याचे उघड झाले. या नोटा पुन्हा बाजारात चलनात आणल्या जात नसून त्यांचा कागद इतर वस्तू बनवण्यासाठी वापरला जातो. RBI च्या नियमांनुसार, नोटाबंदी केलेल्या नोटा चलन पडताळणी प्रक्रिया प्रणाली (CVPS) अंतर्गत विघटित केल्या जातात. चलनात नसलेल्या नोटा प्रथम वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागल्या जातात आणि नंतर त्यांचा वापर कशीसाठी करायचा हे निश्चित केले जाते.
अगोदर चलन रद्द करता येईल की नाही हे पाहिलं जातं, त्यानंतर या नोटांच्या क्लिपिंग्ज विटांमध्ये बदलल्या जातात. नोटांच्या क्लिपिंग्जपासून तयार केलेल्या या विटांपासून पुठ्ठ्याचे अनेक प्रकार तयार केले जातात. अहमदाबादमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID) च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटांपासून अनेक गोष्टी बनवल्या होत्या. या कामासाठी आरबीआयने एनआयडीची मदत घेतली होती, त्यानंतर विद्यार्थ्यांनी नोटांच्या क्लिपिंग्जपासून उशा, टेबल लॅम्पसारख्या दैनंदिन वस्तू बनवल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआय जुन्या नोटांचे रिसायकल करत नाही, म्हणजेच नोटाबंदीनंतर त्या नोटा पुन्हा चलनात आणल्या जात नाहीत. जुन्या नोटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत आणि रंगही सोडत नाहीत. अशा परिस्थितीत, त्यांचा वापर इतर कागदी वस्तू बनविण्यासाठी केला जाऊ शकतो.