नवी दिल्ली – तमिळसह हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता कमल हसनच्या यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये त्यांना दाखल करण्यात आले, असून उजव्या पायाच्या हाडात इन्फेक्शन झाल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यातच दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
View this post on Instagram
तसेच त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून हेल्थ बुलेटिन जाहीर करण्यात आले आहे. या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.पायाच्या हाडात संक्रमण झाल्याने शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहे.’
View this post on Instagram
दरम्यान, कमल हसनने आपल्या 232 व्या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नसले तरी त्याला “कमल हसन 232′ असे संबोधले जात आहे. या चित्रपटात अनिरुद्ध रविचंदर हे कंपोझरची भूमिका साकारणार आहे.