‘शरद पवार राष्ट्रपती होणार’? राष्ट्रवादी काँग्रेसने केला खुलासा

मुंबई –  खा. शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या निराधार आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

कालपासून माध्यमांमधून शरद पवार राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर आज( 14 जुलै) नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झालेली नाही वा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.