आग्रा : देशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहालला पर्यटकांसाठी गुरुवारी अचानक बंद केलं गेलं आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन ताज महलमध्ये स्फोटकं ठेवल्याची माहिती दिली होती. हि माहिती मिळताच CISF च्या जवानांना ताज महलमधील पर्यटकांना बाहेर काढल आहे. सध्या खबरदारी बाळगत संपूर्ण परिसराची तपासणी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दिनांक 4.3.21 को मो.न. 8318881301 से सूचना प्राप्त हुई कि ताजमहल के पास बम रखा है, जो कुछ देर बाद ब्लास्ट हो जायेगा। आगरा पुलिस द्वारा त्वरित कार्यवाही करते हुये @cosadar द्वारा मय टीम के साथ ताजमहल परिसर में चैकिंग अभियान चलाकर तलाशी ली जा रही है। #sp_protocol_bite@Uppolice pic.twitter.com/rE2IbJSMYl
— AGRA POLICE (@agrapolice) March 4, 2021
यातच नुकत्याच वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, नोकरभरती रद्द झाल्याच्या रागातून फिरोजाबादमधील एका युवकाने ताज महलमध्ये स्फोटकं ठेवल्याची अफवा पसरवल्याची दिली असल्याचे सांगितले जात आहे.
बेरोजगारीच्या मुद्यावरुन सध्या देशात असंतोष आहे. अशा पार्श्वभूमीवर या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी कदाचित या मार्गाचा वापर केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आग्रा पोलीस याबाबत तपास करीत असून या घटनेबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.