मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिरसह ज्येष्ठ नेते छगन भुजबळही शिवसेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. परंतु, या वृत्ताचे खंडन छगन भुजबळ यांनी स्वतः केले आहे. तसेच माझ्या शिवसेना प्रवेशाची बातमी ही निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
छगन भुजबळ म्हणाले कि, सचिन अहिर यांच्यासंदर्भातील वृत्त मी टीव्हीवर ऐकलेले आहे. माझे आणि सचिन अहिर यांचे काही बोलणे झालेले नसल्याचा सा खुलासाही छगन भुजबळांनी केला आहे. दरम्यान, येवला येथे आज भुजबळांच्या हस्ते मांजरपाडा प्रकल्प जलपूजन करण्यात आली आहे.