जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
पुणे – भोर तालुक्यातील भाटघर धरणांमध्ये कोणत्याही प्रकारची गळती नाही. भाटघर धरणात गळती सुरू असल्याची अफवा पसरवली जात आहे. नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
भाटघर धरणातून गळती सुरू असल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरत आहे. यावर विचारले असता जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, भोर तालुक्यात पावसाचा जोर कायम असून भाटघर आणि नीरादेवघर ही दोन्ही ओव्हर फ्लो झाली असून भाटघर धरणातून 40 हजार क्युसेक व नीरा देवघर मधून 12 हजार क्यूसेक वेगाने विसर्ग होत असल्याने निरा नदीला महापूर आला असून पूराचे पाणी आज सकाळी 8:00 वाजता भाटघर वीज निर्मिती केंद्रात शिरले. भाटघर धरणाच्या पॉवर हाऊस जवळील भिंतीतून मोठी गळती होत असल्याने हे पाणी प्रामुख्याने पॉवर हाऊसमध्ये शिरल्याने वीज निर्मिती ठप्प झाली आहे, अशी अफवा पसरली होती.