प्रो-कबड्डीबाबतच्या वृत्ताचा आयोजकांकडून इन्कार

नवी दिल्ली – प्रो-कबड्डी लीग श्रीलंकेत होणार असल्याच्या वृत्ताचा आयोजकांनी इन्कार केला आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या संघ मालकांनी ही स्पर्धा करोनाचा धोका कमी असलेल्या श्रीलंकेत आयोजित करण्याची तयारी दर्शवल्याचे वृत्त गुरुवारी प्रसिद्ध झाले होते, त्यावर स्पर्धेचे आयोजक मार्शल स्पोर्टसने हे स्पष्टीकरण दिले आहे. 

करोनामुळे ही स्पर्धा श्रीलंकेत होणार असल्याचे जाहीर झाल्याच्या वृत्ताचा आयोजकांनी इन्कार केला असून ही स्पर्धा यंदा श्रीलंकेत आयोजित करण्याबाबत विचार झालेला नाही. करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने दरवर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होत असलेली ही स्पर्धा लांबणीवर टाकली जाणार का, याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.

योग्य वेळी याबाबत सर्व काही जाहीर केले जाईल, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. या स्पर्धेचे यंदा 8 वे वर्ष आहे. करोनामुळे सर्व परिस्थितीचा आढावा घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडू, चाहते आणि प्रत्येकाचे आरोग्य मूळ स्पर्धेपेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टींशी तडजोड केली जाणार नाही, असेही आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.