मुंबई – अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने मुंबईत एक आलिशान घर बनवलं आहे. महालासारख्या वाटणाऱ्या या बंगल्याचे फोटो नवाझुद्दीनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. नवाझुद्दीनच्या मुंबईतील या घराचे काम पूर्ण झाले आहे.
घर खुपच सुंदर असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून देण्यात आल्या आहेत. बंगल्यापुढे एक सुंदर गार्डन देखील आहे. नवाझुद्दीनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो या गार्डनमध्ये एका खुर्चीवर बसून पुस्तक वाचताना दिसत आहे.
दरम्यान, नवाझुद्दीनने या घराचे काम करवून घेताना त्याच्या जुन्या घराच्या इंटीरियरची प्रेरणा घेऊन हे घर तयार करवून घेतले आहे. विशेष म्हणजे या घराचे नाव त्याच्या वडिलांच्या आठवणीत ‘नवाब’ असे ठेवले आहे. नवाझुद्दीन त्याच्या घराबाहेरील गार्डनमध्ये फोटोशूट करुन हे फोटो बऱ्याचदा शेअर करताना दिसत असतो. सध्याच्या घडीला नवाझुद्दीन हिंदीतील एक आघाडीचा अभिनेता असून त्याचे आगामी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. त्याचा चाहतावर्ग सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहे.