नांदेड :- कोरोना विषाणु संदर्भात आज शनिवार 25 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकुण 962 संशयितांची नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेले स्वँब एकुण 649 आहेत, त्यापैकी 605 निगेटिव्ह असून 38 स्वँब अहवाल प्रलंबित आहेत.
आतापर्यंत एकूण 5 स्वँब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. एकूण घेण्यात आलेले स्वँब 649 असून त्यापैकी 1 रुग्णाचा स्वँब पॉझीटिव्ह आढळला आहे. हा रुग्ण हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारासाठी दाखल आहे.
या रुग्णास मधुमेह, उच्च रक्तदाब व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे. या रुग्णाच्या संपर्कातील एकूण 80 व्यक्तींचे स्वँब घेण्यात आले, या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवावर विश्वासु ठेवु नका, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.