नवी दिल्ली – टेलिव्हिजन वाहिन्यांवर अनेक रिऍलिटी शो सुरू आहेत. मात्र या रिऍलिटी शोमध्ये अनेक मनोरंजनाच्या नावाखाली वादग्रस्त कृती घडविण्यात येत. असंच एक प्रकरण समोर आलं असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवण्यात आली आहे. त्यामुळे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने झी एंटरटेन्मेंट इंटरप्रायजेस लिमिटेडला नोटीस पाठवली आहे.
झीच्या ज्युनियर सुपर स्टार्स सीझन ४ या कार्यक्रमात दोन मुलांनी नोटाबंदीवर विडंबन केले होते. यासोबतच ही मुले पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पोशाखाची खिल्ली उडवतानाही दिसली होती.
नोटीसमध्ये म्हटलं की, १५ जानेवारी रोजी प्रसारित झालेल्या रिऍलिटी शोच्या प्रसारणाबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. या शोमध्ये दोन बाल स्पर्धकांनी पंतप्रधान मोदी यांची खिल्ली उडवणारे स्किट सादर केल्याचा आरोप आहे.
We urge @ZEECorporate to take actions & public apology from @ZeeTamil, Producer, program judges & person responsible for the false comments about @PMOIndia in “Junior super Stars” program. We also condemn for using kids for someone’s political agenda.@annamalai_k @Murugan_MoS pic.twitter.com/tIznaBzogx
— CTR.Nirmal kumar (@CTR_Nirmalkumar) January 17, 2022
या संदर्भात तामिळनाडूमधील भाजपच्या आयटी सेलचे अध्यक्ष सीटीआर निर्मल कुमार यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मीडिया हाऊसकडे सात दिवसांत उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे.
निर्मल कुमार यांच्यानुसार, शोमध्ये नोटाबंदी, पंतप्रधानांचे परदेश दौरे आणि पंतप्रधानांच्या पोशाखाबद्दल निंदनीय टिप्पणी करण्यात आ आहे.