ऑस्ट्रेलियाच्या नागरिकांसाठी फेसबुककडून “न्यूज’ ब्लॉक

सिडनी, – फेसबुकने बुधवारपासून ऑस्ट्रेलियातील नागरिकांसाठी बातम्या रोखल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील ग्राहकांना फेसबुकवरील बातम्या पहाणे, शेअर करणे, कॉमेंट करणे रोखण्यात आले आहे, असे फेसबुकने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सोशल मिडीयासंदर्भात नवीन कायदा केला जाणार आहे. त्यानुसार बातम्या प्रसिद्ध करताना प्रकाशनाला फेसबुककडून मोबदला दिले जाणे अनिवार्य केले जाणार आहे. यामुळेच फेसबुकने ऑस्ट्रेलियासाठी “न्यूज ब्लॉक’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

वृत्तविषयक प्रकाशने आणि फेसबुकमधील संबंधांचे प्राथमिक स्वरुप लक्षात न घेताच ऑस्ट्रेलियाने हे निर्बंध आणण्याचे ठरवले आहे, असे फेसबुकच्या “ग्लोबल न्यूज पार्टनरशीप’ विभागाचे उपाध्यक्ष कॅम्बेल ब्राऊन यांनी एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे. फेसबुककडून बातम्या चोरल्या जातात, असा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्ष्यात फेसबुक न्यूज कंटेंट कोणाकडूनही चोरत नाही. उलट प्रकाशकच त्यांच्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी फेसबुकचा पर्याय निवडतात. बातमीच्या व्याख्येविषयी प्रस्तावित कायद्यामध्ये स्पष्ट मार्गदर्शन नाही म्हणून आम्ही कायद्याच्या मसुद्याचा आदर करण्यासाठी व्यापक व्याख्या केली आहे. त्यामुळे भविष्यात ऑस्ट्रेलियातील नागरिकांसाठी बातम्यांचा समावेश केला जाऊ शकेल, अशी आशाही कॅम्बेल यांनी ब्लॉगमध्ये व्यक्‍त केली आहे.

जर प्रस्तावित विधेयक मंजूर झाले आणि त्याचे कायद्यात रुपांतर झाले तर ऑस्ट्रेलियासाठी “न्यूज कंटेंट’ ब्लॉक करण्यात येईल, असे जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिनेटमध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान फेसबुकने म्हटले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.