नाविण्यपुर्ण फटक्‍यांमुळे यशस्वी होतोय – केदार जाधव

हैदराबाद – माझ्या भात्यात असलेली नाविण्यपुर्ण फटके आणि फलंदाजी करताना महेंद्रसिंग धोनीने केलेले मोलाचे मार्गदर्शन यामुळे आजच्या सामन्यात मी यशस्वी पणे अखेर पर्यंत मैदानावर फलंदाजी केली असे विधान भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या केदार जाधवने सामन्यानंतर बोलताना केले आहे.

यावेळी, 237 धावांचा पाठलाग करत असताना केदारने 87 चेंडूत नाबाद 81 धावा तर धोनीने 72 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला. या बद्दल बोलताना केदार म्हणाला की, ज्यावेळी मी फलंदाजीला आलो त्या वेळी भारताच्या चार विकेट पडल्या होत्या. त्यामुळे आम्ही सावध फलंदाजी करताना ऍडम झम्पाला आपलि विकेट मिळू द्यायची नाही असे ठरवले होते. कारण मधल्या षटकांमध्ये झम्पा फारच प्रभावीपणे गोलंदाजी करत होता. यावेळी सावध फलंदाजी करताना एकेरी आणि दुहेरी धावा करण्यावर आम्ही भर दिला त्यामुळे आमचा जम बसत गेला आणि आम्ही सामन्यात पुनरागमन केले.

तसेच यावेळी त्याला त्याच्या अर्धशतकानंतर त्याने आपला गेअर बदलत जास्त वेगाने धावा केल्या बाबद विचारले असता त्याने सांगितले की, मी बऱ्याचदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याच बरोबर मी सातत्याने नाविण्यपुर्ण फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे विजय दृष्टिपथात आल्यानंतर मी मोठे खेळण्याचा निर्णय घेतला आणि बऱ्याच अंशी मी त्यात यशस्वी देखील ठरलो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.