‘हे’ अ‍ॅप ठरेल महिलांच्या सुरक्षेसाठी वरदान; जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली – ट्रू कॉलर हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. आता या स्वीडिश कंपनीने एक नवीन अ‍ॅप बाजारात आणले आहे. ‘गार्डीयन्स’ या अ‍ॅपद्वारे वापरकर्ते त्यांच्या प्रियजनांचा सहज मागोवा घेऊ शकतील. हे अ‍ॅप जागतिक स्तरावर लाँच केले जात आहे. विशेष गोष्ट अशी आहे की ट्रूकॅलरचे नवीन अ‍ॅप गार्डियन्स स्टॉकहोम आणि भारतीय टीमने 15 महिन्यांत तयार केले आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार हे अ‍ॅप खासकरुन स्त्रियांच्या सुरक्षेसाठी तयार केले गेले आहे. ट्र्कॉलरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऍलन मामेडी यांचे म्हणणे आहे की बाजारात शेकडो वैयक्तिक सुरक्षा आणि लोकेशन शेअरिंग अ‍ॅप्स आहेत परंतु यापैकी कोणतेही अ‍ॅप गार्डियन्स अ‍ॅपप्रमाणे काम करत नाहीत. चला तर, या अ‍ॅपमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया.

गार्डियन्स अ‍ॅपमधील ‘शेअर लोकेशन’ या फिचरच्या मदतीने वापरकर्ते त्यांच्या पालकांशी संपर्क साधू शकतात. यात आपणास हवे असल्यास आपण कुठेतरी जात असाल तर त्या ठिकाणचे लोकेशन शेअर करू शकता. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत लोकेशन शेअरींग पर्यायही देण्यात आला आहे.

या अ‍ॅपमध्ये बॅटरी आणि नेटवर्क स्टेटसदेखील दिसेल.
आपण आपले लोकेशन शेअर करता तेव्हा आपल्या पालकांना आपल्या मोबाइल बॅटरीची आणि नेटवर्कची परिस्थिती देखील कळेल. आपल्या फोनवर बॅटरी किती आहे आणि तो किती काळ टिकेल हे त्यांना हे कळेल. रिपोर्टनुसार येत्या काही काळात ही कंपनी आपत्कालीन जागी स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना देण्याचेही काम करणार आहे.

या अ‍ॅपमध्ये लॉगिन करण्याचे दोन मार्ग आहेत. जर आपण ट्रू कॉलर अ‍ॅपवर असाल तर आपण त्याच्या आयडीसह गार्डीयन्स अ‍ॅपवर लॉग इन करू शकता. आपण ट्रू कॉलर वापरकर्ता नसल्यास फोन नंबरसह पडताळणीनंतर आपण लॉग इन करू शकता. याशिवाय मिस कॉल देऊन तुम्ही ओटीपी मिळवू शकता. हे अ‍ॅप वापरकर्त्यांस स्थान, संपर्क आणि फोनसाठी परवानगी विचारते. यामध्ये वापरकर्ते लोकेशन शेअरिंग इच्छेनुसार कधीही बंद करू शकतात.

बॅटरीचा कमी वापर
कंपनीचे म्हणणे आहे की त्यांचे अ‍ॅप स्मार्टफोनची बॅटरी कमीत कमी वापरते. कंपनी म्हणते की आपण लोकेशन शेअर करत असलात तरी ते बॅकग्राउंडवर काम करत असते. त्यामुळे हे अ‍ॅप स्मार्टफोनची कमीत कमी बॅटरी वापरते. या अ‍ॅपमध्ये आपातकालीन बटणदेखील दिलेले आहे, जे टॅप करून आपण आपल्या पालकांना सूचित करू शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.