YouTube | पुढील आठवड्यापासून ‘यु ट्यूब’ वरील ‘या’ फिचरमध्ये होणार बदल!

प्रभात वृत्तसेवा – यूट्यूब हे आजकाल सोशल मीडियाचे सर्वात मोठे व्यासपीठ बनले आहे जिथे लाखो लोक सामील होतात आणि त्यांचे अनुभव शेअर करतात. आणि यावर लोकांच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळतात. परंतु, सध्या युट्यूबवर ‘लाईक’च्या बटणापेक्षा जास्त लोक ‘डिसलाईक’ बटण दाबणे पसंत करतात. थोडक्यात, व्हिडीओ डिसलाईक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

परंतु आता यु ट्यूब त्यांच्या कन्टेन्ट क्रिएटर्ससाठी ‘डिसलाईक’ हे फिचरच डिलीट करण्याची योजना आखत आहे. कंपनीने जाहीर केले आहे की ती आता काही नवीन डिझाइनवर काम करत आहे, ज्यामध्ये डिसलाईक हे ऑप्शन वापरकर्त्यांना दिसणार नाही. हा पर्याय कदाचित लोकांना दिसणार नाही परंतु निर्माते तो पाहू शकतात. पुढील आठवड्यापासून हा बदल अंमलात आणला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

* हे बटण योग्य अभिप्रायासाठी आहे

आपण हे लक्षात घेतले असेल की यु ट्यूब च्या व्हिडिओंना पसंती, नापसंती, शेअर, डाउनलोड आणि सेव्ह करण्याचा पर्याय आहे. हे पर्याय अजूनही राहतील, फक्त बदल डिसलाईक बटणात असेल. तथापि, युट्यूबचे डिसलाईक हा पर्याय वापरकर्त्यांच्या अचूक अभिप्रायासाठी आहे आणि निर्मात्यांना त्यांचे व्हिडिओ लोकांनी किती पसंत केले किंवा नापसंत केले आहेत हे त्यांना या साधनांमधून माहित होते.

* आता त्याचा गैरवापर होत आहे
असे म्हटले जात आहे की युट्यूबमध्ये लाईक, डिसलाईक यासारख्या बटणावर लोक आता आपला राग व्यक्त करू लागले आहेत. आणि यामुळे डिसलाईक बटणाचा सध्या गैरवापर केला जात आहे. आता नापसंती दर्शविणारे बटण निषेध करण्याचा एक मोठा पर्याय बनला आहे.

* बटण काढून टाकल्यामुळे निर्मात्यांना फायदा होईल.
युट्यूब प्लॅटफॉर्मवरून डिसलाईक बटण काढल्याने व्हिडीओ निर्मात्यांना त्यापासून किती फायदा होईल हे माहित नाही, परंतु निर्मात्यांना त्यांच्या सिस्टममध्ये नक्कीच खरा अभिप्राय मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.