UP | करोना व्यवस्थापनाकडे लक्ष द्या; आदित्यनाथांना घरच्या आहेराचा योग

नवी दिल्ली, दि. 9- उत्तर प्रदेशमधील करोना व्यवस्थापनाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राद्वारे दिला आहे.
बरेलीतील आरोग्य विभगाचे अधिकारी दूरध्वनीही उचलत नाही, अशी तक्रारही त्यांनी केली आहे. राज्यातील आरोग्य सेवा निश्‍चित करण्याची सूचनाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मध्यप्रदेशप्रमाणे ऑक्‍सिजन प्लांट उभारा. ते उभे करण्यासाठी 50 टक्के अनुदान द्या, अशीही सूचना त्यांनी केली.

बायपॅप यंत्रे, व्हेंटिलेटर्स आणि अन्य वैद्यकीय उपकरणांचा काळाबाजार होत असल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला आहे. खासगी नोंदणीकृत रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे स्वस्त देण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच या उपकरणांच्या किंमती निर्धारीत कराव्यात, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.