निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज योगाभ्यास केला पाहिजे. नियमितपणे योग केल्यास विविध रोगांपासून बचाव होतो. सध्याच्या काळात लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी बरेच उपाय करतात. पुढे सांगितलेले योगासन नियमित केल्यास तुम्ही निरोगी आणि तंदुरुस्त राहाल. पाहुयात कोणते योगासन तुम्हाला फिट अँड फाईन ठेवेल..
1. ताडासन :
दररोज ताडासन केल्याने शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहतं. ताडासन करणे देखील खूप सोपे आहे. ताडासन उभे राहून केले जाते. ताडासन नियमितपणे केल्याने पोटाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते. मूळव्याध रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. मूळव्याध रूग्णांनी दररोज ताडसान नियमित करावे.
2.भुजंगासन :
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी भुजंगासन नियमित करावे. भुजंगासन करून फुफ्फुसे मजबूत होतात. दररोज भुजंगासन नियमित केल्याने ओटीपोटात चरबी कमी होते. फुफ्फुसांशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी दररोज भुजंगासन करावे.
3. शवासन :
शवासनाचा सराव करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे अगदी सोपे आहे. उच्च रक्तदाब रूग्णांनी नियमितपणे दररोज शवासनाचा सराव करावा. निद्रानाश आणि तणावाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी देखील दररोज शवासनाचा अभ्यास करावा.
4. उष्ट्रासन :
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज उष्ट्रासनाचा अभ्यास करावा. या आसनाचा सराव केल्यास अनेक प्रकारचे रोग टाळता येतात. नियमितपणे दररोज उष्ट्रासनाचा अभ्यास करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.