#WrestleRome : बजरंग पूनियाने पटकावले सुवर्णपदक

रोम : भारताचा कुस्तीपटू बजरंग पूनिया याने रोम रँकिंग सीरिज स्पर्धेत फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे. २५ वर्षीय बजरंगने ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जाॅर्डन मायकेल आॅलिव्हरचा ४-३ने पराभव करत विजय नोंदविला.

तत्पूर्वी, शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बजरंगने यूक्रेनच्या वासिल शुपतार याचा ६-४ ने पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

याआधी, बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जोसफ क्रिस्टोफर मैक केना याचा ४-२ ने तर पहिल्या फेरीत बजरंगने अमेरिकेच्या जैन एलेन रदरफोर्डचा ५-४ ने पराभव करत आगेकूच केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.