व्हॉट्‌सऍपच्या प्रायव्हसी पॉलिसीतील बदलाबाबत भारत सरकारचा ‘आक्षेप’

नवी दिल्ली – व्हॉट्‌सऍप या मेसेंजिंग ऍपने आपली प्रायव्हसी पॉलिसी एकतर्फी पद्धतीने बदलण्याचा निर्णय घेतला आहे, त्याला भारत सरकारने आक्षेप घेतला असून हे प्रस्तावित बदल मागे घ्यावेत अशी मागणी भारत सरकारच्यावतीने करण्यात आली आहे.

या संबंधात माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्‌सऍपच्या सीइओंना एक पत्र पाठवून या बदलांविषयी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रस्तावित बदल भारतीय नागरीकांमध्येही गोंधळ माजवणारे ठरले आहेत असेही भारत सरकारने त्यांना कळवले आहे.

व्हॉट्‌सऍप वापरणाऱ्यांच्या डाटाची व प्रायव्हसीची सुरक्षा कायम राहिली पाहिजे आणि त्यांना चॉईसचेही स्वातंत्र्य असले पाहिजे असे भारत सरकारने त्यांना कळवले आहे. अशा एकतर्फी पद्धतीने केले जाणारे प्रायव्हसी धोरणाच्या संबंधातील बदल मान्य केले जाणार नाहीत असेही त्या कंपनीला सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.