पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने गुरुवारी (दि.27) एक दिवस सायंकाळी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.28) शहरातील सर्वच भागांमधील पाणीपुरवठा सकाळी अपुऱ्या दाबाने होणार आहे. मात्र पाणी कपातीमुळे बंद असलेल्या भागाला. बुधवारी (दि.26) आणि शुक्रवारी (दि.28) त्या-त्या दिवशी नियमितपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. या काळात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर कारावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.